
युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी :युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल (1 एप्रिल,2023 रोजी वयाबाबत परिगणना करावी). युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धापूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत गुगल लिंकवर 22 नोव्हेंबर पर्यंत भरण्यात यावे. जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालयातील जास्तीत जास्त युवक – युवती, संघांनी, महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.