
कामाच्या बहाण्याने शारीरिक संबंध; संशयिताला पोलिस कोठडी
खेड:- कामाच्या बहाण्याने विवाहितेस भरणे येथील एका रिसॉर्टमध्ये आणून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रवीण सुधाकर डोंगरे (५६ रा. भांडूप-मुंबई) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना २०१९ ते २०२१ या कालावधीत घडली होती. संशयित हा मुंबई- अंधेरी येथील एका कंपनीत कार्यरत होता. या प्रकरणात प्रवीण डोंगरे याच्या पत्नीनेही पीडित विवाहितेस दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.