
सैतवडे सरपंचपदी साजिद शेकासन यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी :तालूक्यातील सैतवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर साजिद शेकासन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील प्रत्येक घटकाचा विकास हाच अजेंडा यापुढे राबवला जाईल असे सरपंच शेकासन यांनी सांगितले.
उद्योजक साजिद शेकासन हे वाटद विभागात उद्योगमंत्री ना. उदय सामंत, भैय्या सामंत, अण्णा सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिंदे गटाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणुन ओळखले जातात. जिल्हा प्रशासनातील तसेच तालुकास्तरावरील सर्व अधिकारी , कर्मचारी वर्गासोबत असलेले सलोख्याचे संबंध सैतवडे गावाच्या विकासासाठी उपयोगात येतील अशा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
गावातील सर्व घटकातील नागरिक, सदस्य सर्वांना सोबत घेउन गावाच्या विकासासाठी समर्पक काम करु.” असे नवनिर्वाचित सरपंच यांनी सांगितले. निवड प्रक्रीये वेळी शिवसेना वाटद विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर , उपविभागप्रमुख अजिम चिकटे, माजी सरपंच सागर कदम, उपसरपंच सुवेश चव्हाम, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच वाटद व सैतवडे जाकादेवी परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.