
करबुडे येथे हातभट्टीची पाच लिटर दारु जप्त
रत्नागिरी ः तालुक्यातील करबुडे-सोनारवाडी येथील एका घराच्या बाजूस विनापरवाना हातभट्टीची गावठी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २६० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजल सुरेश सागवेकर (वय २१, रा. करबुडे-कुंभारवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास करबुडे-सोनारवाडी येथील एका घराच्या बाजूला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे २६० रुपयांची पाच लिटर हातभट्टीची दारु सापडली. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.