
बागेत काम करणाऱ्या नेपाळ्याचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः आंबा बागेत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नेपाळ्याला उपचारासाठी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रिका बिच्चू लोनियॉ (वय ४४, रा. भजनी, जि. कैलाली नेपाळ) असे मृत नेपाळ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास वाटद-खंडाळा येथील रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोनियॉ हा आबा बागेत काम करणाऱा असून त्याला मद्याचे व्यसन होते. रविवारी मद्य प्राशन करुन आंबा बागेत झोपला होता. बागेतील काम आटोपल्यानंतर खबर देणार यांनी त्याला घरी जाण्यासाठी हाक मारली त्याची हालचाल काही दिसली नाही म्हणून कामगारांनी उपचारासाठी वाटद-खंडाळा येथील रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.