
बेशुद्धावस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कामथे येथे बेशुद्धावस्थेत सापडलेल्या अनोळखी प्रौढाला उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ६) वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखीचे अंदाजे वय 49 आहे. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर एसआर इंग्रजीमध्ये तर रखा, दीपा, सतीश, गणेश, सरस्वती असे मराठीत गोंदलेले आहे. उजव्या हाताच्या मनगटावर दिल गोंदलेले असून त्यामध्ये मराठीमध्ये नाव अस्पष्ट दिसत आहे. या अनोळखीची माहिती मिळाल्यास जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिसचौकीत अथवा शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.