
विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
संगमेश्वर:- तालुक्यातील येथील कोंडगाव मच्छीमार्केटच्या मागे झोपड्यांत विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. यात ८८० रुपयांची १४ लिटर दारू जप्त केली असून, देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सोमा घडशी (वय ४२, रा. भडकंबा, बेर्डेवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयितांचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडगाव- मच्छीमार्केट येथे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी रविवारी (ता. ५) कारवाई केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन भोंडवे यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास देवरूख पोलिस अंमलदार करत आहेत.