
विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई
रत्नागिरी :तालुक्यातील नेवरे बाजारपेठ येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४५० रुपयांची नऊ लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.
मुरलीधर श्रीराम मयेकर संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) रात्री सव्वादहा सुमारास निदर्शन नेवरे बाजारपेठ येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवरे बाजारपेठ येथे विनापरवाना हातभट्टीची गावठी दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये संशयित मुरलीधर बाजापेठ येथे ४५० रुपयांची ९ लिटर दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी महिला पोलिस रागिनी सावंत यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.