
‘मनसेला अंगावर घ्यायचा प्रयत्न केल्यास मनसे शिंगावर घेणारच’ ..!
जयस्तंभ शेअर रिक्षा थांबा उद्घाटन प्रसंगी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
रत्नागिरी: शहरातील जयस्तंभ येथील शेअर रिक्षा थांबा मंजूरी श्रेयवादातून शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखांनी केलेल्या ‘ मनसे म्हणजे आयत्यावर कोयता’ या टीकेला मनसेने चोख प्रत्युत्तर दिले आहे शनिवारी सायंकाळी मनसे पदाधिकारी व रिक्षाचालकांच्या उपस्थितीत फटाके फोडून जयस्तंभ येथे शेअर रिक्षा थांब्याचे उद्घाटन दणक्यात करण्यात आले याप्रसंगी बोलताना मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून एखादा विषय हाती घेतो तेव्हा त्याचा पूर्ण पाठपुरावा करतो. जयस्तंभ शेअर रिक्षा थांबा मागणीसंदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी सौंदळकर व मी स्वतः सरकारी खात्यांमध्ये केलेल्या
पाठपुराव्यासंदर्भातील निवेदन पुरावा म्हणून आमच्याकडे आहे.असा पुरावे त्यांच्याकडे असल्यास त्यांनी सादर करावा उगाच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये हीच तत्परता जनतेच्या इतर समस्यांवेळी दाखवली तर बर होईल,काही दिवसांपूर्वी एका शेअर रिक्षाचालकास मारहाण झाली त्याला जिल्हा रुग्णालयात जागा मिळत नव्हती, पोलीस तक्रारीसंदर्भात सहकार्य होत नव्हते तेव्हा त्यांच्यापाठी मनसे पदाधिकारीच उभे होते हे शहरप्रमुख महाशय त्यावेळी कुठे होते असा सवाल उपस्थित केला
व मनसेला अंगावर घेण्याचा प्रयत्न केल्यास मनसे शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही..! असा इशाराही देण्यात आला
, यावेळी बोलताना रिक्षाचालक इम्रान नेवरेकर यांनी या शेअर रिक्षा थांब्यासंदर्भात पाठपुरावा करताना प्रत्येक वेळी मनसे पक्ष- पदाधिकारी कायम आमच्या सोबत होते, आम्ही प्रवाश्यांच्या सह्या देखील यासाठी गोळा केल्या असे सांगत आम्ही कायम मनसेसोबतच आहोत व राहणार कारण ‘प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा’ म्हणत याला दुजोरा दिला यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी,मनविसे जिल्हाध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण,मनसे शहर सचिव अजिंक्य केसरकर,उपशहरअध्यक्ष सिद्धेश धुळप, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिशजी खामकर,अनंत शिंदे,निखिल आंब्रे,धनंजय पाटील,शेअर रिक्षाचालक इम्रान नेवरेकर,प्रदीप साळुंखे, ताज रिफाई,मुजाईद मुल्ला, नितिन धनावडे, अकबर धामणस्कर, खलील रिफाई, संदीप तावडे, विलास रनसे, अनंत रहाटे, नवनाथ कुड, मोफी मुल्ला, अनंत रहाटे, दिलीप रहाटे, सुहास लोहार आदी उपस्थित होते.