
जळगाव येथील आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनाला पाठिंबा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ऑफ्रोह’चे नारे निदर्शने आंदोलन
रत्नागिरी: जळगाव येथे आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनाला पाठिंबा, १४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक व मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ हुयमन शाखा रत्नागिरीच्या वतीने च्या वतीने शुक्रवारी ( ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दु.४ ते ५ या वेळेत नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले .
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या वतीने महसूल तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.
जळगाव येथे कोळी समन्वय समितीच्या वतीने दि.१० ऑक्टोबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘कोळी’ नोंदीवरून ‘कोळी महादेव’, ‘टोकरे कोळी’,’मल्हार कोळी’, ‘ढोर कोळी’ या जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे या मुख्य मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ,अधिसंख्य पदाच्या सेवालाभ व सेवानिवृत्तीविषयक लाभाच्या दि.१४/१२/२०२२ च्या शासन निर्णयात तृटी असल्याने त्याचे शुद्धीपत्रक काढण्यात यावे.तसेच
मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी- कर्मचा-यांना सेवानिवृत्तीवेतन व सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळण्यासाठी ऑफ्रोह ठाणेच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
नारे निदर्शने आंदोलनाप्रसंगी
ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, उपाध्यक्ष नंदा राणे,
सचिव बापूराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे,
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा पारशे, सचिव सुनंदा देशमुख, सहसचिव स्वाती रोडे , देविकीनंदन सपकाळे,दादाजी बच्छाव, नारायन गाजूलवार,श्रीकृष्ण भांडे,धनंजय भांडे,अरुण बविस्कर, पंडीत सोनवणे,सूरेखा घावट ,विलास घावट , प्रतिभा रोडे ,रुशिकेश रोडे ,निकिता देशमुख, वैष्णवी चेचरे,नितीन चेचरे,चंद्रकांत कडू ,हरीभाऊ ताडे इ. पदाधिकारी ,सभासद उपस्थित होते.