
गुहागरच्या अथर्व शिर्के याची मलेशियासाठी निवड
नाथजोगी समाजाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
रत्नागिरी:- दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात फ़ॉरेस्ट्रीचे शिक्षण घेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुहागर जानवळे येथील अथर्व प्रमोद शिर्के याची पुढील शिक्षणासाठी मलेशियाकरिता निवड झाली आहे. मैदानी खेळासह सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करून अथर्व याने नाथजोगी समाजाचे नावलौकिक केले आहे.
नुकताच दापोली कृषी विद्यापीठात एक कार्यक्रम पार पडला त्यामध्ये मलेशियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अथर्व याच्यावर कुटुंबातूनच शैक्षणिक संस्कार झाले आहेत. आई प्रिया (मेघा) शिर्के या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापीका असून वडील प्रमोद हे व्यावसायिक आहेत. घरचे वातावरण शिक्षणासाठी पोषक असल्याने अथर्व याने उतुंग भरारी घेतली आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.