
मिनीबसची 2 दुचाकीसह कारला
धडक; जीवितहानी टळली
रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता मिनी बसच्या गाडीची दोन दुचाकी आणि एका कारला धडक बसून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी ते चिपळूण जाणाऱ्या गाडीवरील चालकाचा हातखंबा येथे ताबा सूटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका बलेनो कारला पाठीमागून धडक देत अपघात केला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.