
विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
दापोली : विनापरवाना दोन ब्रास वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी डम्पर मालकाविरुद्ध दापोली महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परवेज मुजाफर सरखोत असे डम्पर मालकाचे नाव आहे. ही घटना ३० ऑक्टोबरला दुपारी दापोली हर्णे मार्गावर दापोली येथील तहसील कार्यालयासमोर उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, डम्पर मधून दोन ब्रास वाळूची विनापरवाना वाहतूक होत असताना दापोलीचे तलाठी गुरूदत्त लोहार यांनी या डंपरवर कारवाई केली. पंचनामा करून हा डम्पर ताब्यात घेण्यात आला. या डम्परचे मालक परवेज सरखोत यांना २ लाख १ हजार २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दंडाची रक्कम भरून हा डम्पर सोडण्यात आला आहे.