
बोकड खरेदीच्या आमिषाने ९७ हजारांची फसवणूक
रत्नागिरी : ऑनलाईन बोकड खरेदीच्या आमिषाने ९७ हजारांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिजवान खान (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार ३ ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संगमेश्वर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाकीर इस्माईल बोदले यांचा सिझनवार बोकड विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी संशयित रिजवान यांना बोकड खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने ऑनलाईन ९७ हजार रुपये पाठवले; परंतु फिर्यादी यांना बोकड खरेदीसाठी दिलेले पैसे व बोकड न देता फसवणूक केली. या प्रकरणी शाकीर बोदले यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली.