
कोकण रेल्वे मार्गावर आज ३ तासांचा मेगाब्लॉक
खेड:- कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे – चिपळूण विभागादरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १२.१० ते दुपारी ३.१० या वेळेत मालमत्ता देखभालीच्या कामांसाठी ३ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे .
या मेगा ब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले . या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ०२१९७ क्रमांकाची कोईमतूर- जबलपूर स्पेशल २ तास ३० मिनिटांसाठी विन्हेरेला मडगाव – चिपळूण विभागादरम्यान थांबवण्यात येणार आहे . तर १०१०६ क्र.ची सावंतवाडी- दिवा एक्सप्रेस ३१ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी – चिपळूण विभागादरम्यान २ तास ३० मिनिटे थांबवण्यात येणार आहे . या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी , असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.