
विलासराव कोळेकर यांना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर
रत्नागिरी:- दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक व रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाचे सचीव श्री विलासराव कोळेकर यांना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन रविवार दि. ०५ / ११ / २०२३ रोजी आहे. आपण करीत असलेल्या शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारितेच्या कार्याची दखल घेऊन डॉ. बाबुराव घोडके फाऊंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय ‘रयतधारा’ पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, दि. ०५/११/२०२३ रोजी इस्लामपूर येथे सकाळी ९ वाजता पुरस्कार वितरण आयोजित केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र भुषण प्रा. डॉ. अरुण घोडके यांनी दिली. सदर कार्यक्रम मातोश्री हॉल, दत्तटेकडी जवळ, कामेरी रोड, इस्लामपूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
श्री कोळेकर यांच्या निर्भिड व सेवाभावी कामाबद्दल त्यांना क्राईम बॉर्डर या वृतपत्राचा राष्ट्रीय प्रतिभारत्न पुरस्कार, मुंबई संध्या या वृतपत्राचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार पद्मश्री दादा इदाते व Z 24 तासचे निर्माते अजित चव्हाण यांच्या हस्ते सन्मान, एड्समुक्त समाज अभियान गौरवपत्र,राष्ट्रीय लोकनायक पत्रकारिता पुरस्कार, दशभुज फौंडेशनचे मानपत्र, ज्ञान प्रबोधन फाऊंडेशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार, कोकणरत्न चँरिटेबल ट्रस्टचे मानपत्र, कोकणदिप वृतपत्राचा कोकणभूषण पुरस्कार, शांताई प्रतिष्ठान मुंबई चा पत्रकार भूषण पुरस्कार (रोख रुपये अकरा हजार रुपये) ,आनंद एज्युकेशन अकँडमीचे मानपत्र, शांती टाईम्सचा पत्रकार भूषण पुरस्कार ,जनजागृती सेवा समितीचे सन्मानपत्र,प्रेरणा फाऊंडेशनचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आदी अनेक मान सन्मान प्राप्त झाले आहेत.