
भोके-फणसवळे नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह
रत्नागिरी ः तालुक्यातील भोके ते फणसवळे वाहणाऱ्या नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. २९) सायंकाळी साडेचारच्या सुमार निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार यांना गावातील सुरेश कृष्णा शिंदे यांनी फोन करुन एक व्यक्ती मयत स्थितीत नदीपात्रात असल्याचे सांगितले खबर देणार यांनी खात्री केली असता त्याचे अंदाजे वय ४५ वर्षेचे असल्याचे व कुजलेल्या स्थितीत मृतदेह होता. अंगात एकही कपडा नव्हता गावातील सरपंच व ग्रामस्थांना कळवून त्याबाबत खात्री करुन अनोळखी पुरुष असल्याचे खबर ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.