
नेवरे बाजारपेठेत दारू विक्रीवर कारवाई
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे बाजारपेठ येथे एका पडिक घराच्या पाठीमागे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये साहित्यासह २८० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मधुकर केशव आरेकर (वय ६०, रा. मुरूगवाडी, ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. नेवरे बाजारपेठेत विनापरवाना हातभट्टीची दारू विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह २८० रुपये किमतीची पाच लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी पोलिस हवालदार रोशन सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
………….