
क्रांतीनगर येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः शहरातील क्रांतीनगर येथील कमानीच्या बाजूला टि स्टॉलच्या बोळात विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिता्विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निहाल करिम होडेकर (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळी सातच्या सुमारास क्रांतीनगर येथील टि स्टॉलच्या बोळात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अवैद्य मटका जुगार चालवत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याच्याकडून साहित्यासह ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.