
फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन यांच्या तर्फे महिलांसाठी मॅमोग्राफी शिबिराचे नियोजन
रत्नागिरी:- मुकुल माधव फौंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, स्वच्छता आणि समुदाय विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत.या नवरात्रीच्या निमित्ताने महिला सबलीकरणच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत वालावलकर रुग्णालयात संकल्प 2023 मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरांचा प्रवास 2014 मध्ये परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे सुरू झाला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नवरात्रीच्या सणाची संधी घेऊन ही शिबिरे वर्षातून दोनदा आयोजित केली जात आहेत. रत्नागिरीची भोगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन उत्तरेकडील तालुक्यांसाठी 2019 पासून वालावलकर हॉस्पिटलच्या सहकार्याने ही शिबिरे चालू करण्यात आली. आजपर्यंत अशी 14 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली असून हे 15 वे शिबिर आहे. या शिबिरांचे विषेश म्हणजे केवळ या शिबिरांचे आयोजन करत नाही तर शिबिरानंतर पाठपुरावा देखील केला जातो. या शिबिरांचा आजपर्यंत ४००० पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे.
या शिबिराचे उद्घाटन 25 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीमती. धनश्री करंजीकर पोलीस अधीकारी सावर्डे, सौ. अल्बुर्ग. अध्यक्ष ऑपरेशन फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या पत्नी, वालावलकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुवर्णा पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ. वेल्हाळ एचओडी पीएसएम विभाग, डॉ. वाळवेकर एचओडी स्त्रीरोग विभाग, डॉ देसाई एचओडी शस्त्रक्रिया विभाग श्रीमती गांधी कॉन्स्टेबल सावर्डे आणि फिनोलेक्सचे व मुकुल माधव फौंडेशनचे प्रतिनिधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. श्रीमती करंजीकरनी महिलांच्या आरोग्याच्या उन्नतीसाठी अथक प्रयत्नांची प्रशंसा केली. या शिबिराचा केंद्रबिंदू चिपळूण- सावर्डे नगरपालिका कामगार वर्ग, पत्रकार वर्ग, तटरक्षक दल कुटुंबातील महिला व्यक्ती असल्याने खूप आनंद झाला. त्यांनी पुढे सांगितले की, या उपक्रमामुळे कर्मचार्यांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता समाजाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचविण्यात मदत होईल.
वालावलकर हॉस्पिटल सोबतचा हा संयुक्त उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल डॉ. सुवर्णा पाटील आणि डॉ. वाळवेकर यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त सौ रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले. या शिबिराचे आयोजन करून लाभार्थी महिलांना खूप आनंद झाला आणि सर्व महत्त्वाच्या चाचण्या फक्त १०० रुपयात केल्या जात असून पाठपुरावा सुविधाही एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत.