
लोटेमाळ येथून दुचाकीची चोरी
खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लोटेमाळ गावातील माळवाडीत रविवार दि. २२ रोजी रात्री १०.३० ते सोमवार दि. २३ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या कालावधीत घरासमोर उभी करुन ठेवलेली सुमारे साठ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच ०८ ए डबल्यू ४८०१) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
याप्रकरणी निरंजन संतोष कालेकर यांनी लोटेमाळ गावातील माळवाडीत रविवार दि. २२ रोजी रात्री १०.३० ते सोमवार दि. २३ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या कालावधीत घरासमोर उभी करुन ठेवलेली बजाज पल्सर दुचाकी अज्ञाताने चोरट्याने चोरून नेल्याची खेड पोलिसात तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.