
रेल्वे प्रवासात महिलेची पर्स लांबवणाऱ्यास अटक
रत्नागिरी : रेल्वे प्रवासादम्यान महिलेची पर्स लांबवणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. चोरीस गेलेल्या पर्समध्ये दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख १ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल होता. त्यातील एक मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुबीन रफीक पटेल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादी महिलेने शनिवार २१ ऑक्टोबर रोजी त्या भावासह कोकण कन्या एक्स्प्रेसने ठाणे ते सावंतवाडी असा प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्या झोपी गेल्या असता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे संशयिताने त्यांची पर्स चोरुन नेली होती.