
देवरुख ओझरे रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार
देवरुख:- सध्या सर्वत्र बिबट्याचा वावर संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. शहरी किंवा वर्दळीच्या ठिकाणीही रात्रीच्या वेळेस बिबट्याचे दर्शन होत. काही ठिकाणी तर माणसांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. वनविभागाने याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सोमवारी (दि २३) रात्री ११-४५ वाजता देवरुख ओझरे रोड वरील योगेश जागुष्टे यांच्या घरा समोरील रोड वर बिबट्या मुक्त संचार करताना दिसला.
त्याचे दर्शन सीसी टीव्ही च्या माध्यमातुन झाले. या मुळे परिसरात भितीचे वातावरण असून वनविभागाने वेळीच दखल घेण्याची मागणी रहिवाशानी केली आहे.