
तीन वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे काळकाई मंदिराजवळ तीन वाहने एकमेकांवर आदळून रविवारी (ता. २२) दुपारी विचित्र अपघात झाला.
अपघात एकजण किरकोळ जखमी झाला. हा अपघात दोन मोटार व एक दुचाकी यांच्यात झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारीने पुढे वळण घेत असलेल्या दुसऱ्या मोटारीला धडक दिली. त्याचवेळी पहिल्या मोटारीवर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात पहिल्या मोटारीतील एकजण किरकोळ जखमी झाला. त्याला स्थानिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.