
समाजातील कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देणे ही रोटरीसाठी अभिमानाची गोष्ट : श्रीकांत भर्के
श्री मित्र मंडळ , रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी संयुक्त विद्यमाने नारीशक्तीचा गौरव
रत्नागिरी:नवदुर्गा पुरस्कारामागील रोटरीचा हेतू हा समाजातील कर्तृत्ववान महिलांना गौरवणे आणि प्रोत्साहन देणे हा आहे . तसेच समाजातील कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार देण ही रोटरी साठी पण अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन रोटरी अध्यक्ष श्रीकांत भूर्के यांनी केले.
श्री मित्र मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी अंच्या संयुक्त विद्यमाने गौरव नारीशक्तीचा हा नवदुर्गा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री भुर्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री मित्र मंडळ , नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड येथे पार पडलेल्या या सोहळ्यात साहित्य,क्रीडा,सामाजिक,शिक्षण, कला इत्यादी क्षेत्रात तसेच शासकीय सेवेत विशेष योगदान देणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.या सोहळ्यातील पारंपरिक पालखी नृत्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली . त्याचबरोबर जिल्हा स्तरीय दांडिया रास स्पर्धा ह्या देखील पार पडल्या . कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड.मनिष नलावडे व रोटरी महिला आघाडी – माधुरी कळंबटे , रुता पंडित , नीता शिंदे , देवयानी वाघधरे यांनी केले .
कार्यक्रमाला आर्थिक सहाय्य जेष्ठ रोटेरिअन धरमसी चौहान , कॅप्टन दिलीप भाटकर , राजेंद्र घाग , रुपेश पेडणेकर , धीरज वेल्हाळ आणि अध्यक्ष श्रीकांत भुर्के यांनी केले .
कार्यक्रमाला रोटरी मधून विनायक हातखंबकर , अंजली इंदुलकर , दीप्ती भाटकर ,सचिन शिंदे, प्रकल्प आराध्ये , निलेश मुळे , आनंद चौगुले , परेश साळवी , मंदार आचरेकर , रोहित वीरकर , तुषार साळूंखे , सुरेंद्र यार्रम , प्रमोद कुलकर्णी,श्री मित्र मंडळा तर्फे अध्यक्ष सुभाष सावंत , उपाध्यक्ष ॲड.मनीष नलावडे आणि सर्व सदस्य उपस्थित होते तसेच परिसरातील मान्यवर,रहिवासी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व श्री मित्र मंडळ सदस्य ,रोटरी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली .
चौकट
नवदुर्गा पुरस्कार २०२३
वीणा लेले – सामाजिक क्षेत्र
सुरेखा पाथरे – सामाजिक क्षेत्र
सीमा यादव – लेखिका
अपेक्षा सुतार – क्रीडा क्षेत्र
जयश्री गायकवाड – कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी
अरुणा साळवी – शिक्षण क्षेत्र
श्रुती आठल्ये – कला क्षेत्र
श्रद्धा कळंबटे – सामाजिक क्षेत्र
प्रणाली तोडणकर – कला क्षेत्र