
महानगरीतील स्पेशल दांडिया माहौल आता रत्ननगरीतही…
रत्नागिरी :म्युझीकल स्टार्स बँड,आकर्षक डिजिटल साऊंड आणि आकर्षक डिजीटल लाईट अशा स्पेशल दांडिया माहौलमध्ये थिरकण्याची मक्तेदारी फक्त महानगरांचीच नाही. उदय सामंत फाऊंडेशन आणि युवासेना रत्नागिरी यांनी आयोजित केलेला यंदाचा ‘रत्नागिरी दांडिया नाईटस् २०२३’ कार्यक्रम याच पठडीतला किंबहुना त्याहीपेक्षा आकर्षक असेल.
रत्नागिरी दांडिया नाईट्स 2023 उदय सामंत फाउंडेशन आणि युवासेना रत्नागिरी आयोजित रत्नागिरी दांडिया नाईट्स 2023 या दांडिया रास कार्यक्रमाचं आयोजन रत्नागिरीकरांसाठी दि.22आणि 23 ऑक्टोबर या दोन दिवशी सांय. 7 ते रात्रौ 12 वाजेपर्यंत , देसाई बँक्वेट हॉटेल विवेकच्या मागील बाजूला या ठिकाणी करण्यात आले आहे.
या दांडिया रास कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणी , कपल, लहान मुलं, ग्रुप, फॅमीली यांच्यासाठी वेगवेगळ्या राऊंडचे नियोजन करण्यात आले आहे. या मधून बेस्ट डान्सर, बेस्ट जुनियर, बेस्ट कपल, बेस्ट फॅमीली, बेस्ट ग्रुप, बेस्ट कॉस्च्युम याप्रकारची टायटल्स दिली जाणार आहेत.
दांडिया नाईट्स कार्यक्रमाच्या स्थळी या कार्यक्रमाला साजेसा असा डिजीटल साऊंड आणि डिजीटल लाईट्स असणार असून, साऊंड आणि लाईट इफेक्टस ची एक वेगळी रंगत सगळ्यांना पहायला मिळणार आहे. सलग 4 तास चालणारा हा कार्यक्रम म्युझीकल स्टार्स बँड,साऊंड आणि लाईटच्या जोरावर सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची मने जिंकणारा ठरेल याची आयोजकांना खात्री आहे.
हा आगळावेगळा दांडिया रास रत्नागिरीकरांना एक वेगळा अनुभव देऊन जाणार आहे. या कार्यक्रमाची अधिक माहिती हवी असल्यास तुषार साळवी – 7517411111, अभि दुडे-8788096634, प्रथमेश साळवी -9503603835, सिध्देश बंदरकर -9404158807.