
गावडे आंबेरेत हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी :तालुक्यातील गावडे आंबेरे तिवरेकरवाडी येथे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून ३०० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. संशयिताविरुद्ध पूर्णगड सागरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सजानंद धोंडू शिवनेकर (वय ७४) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शिवनेकर है विनापरवाना हातभट्टीची दारू विकत असताना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी पूर्णगड पोलिसात तक्रार दिली.