
महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल
राजापूर : राजापूर शहरात जवाहरचौक परिसर ते बाजारपेठेत भागात एका महिलेचा वारंवार पाठलाग करुन तीला रिक्षात बसण्यासाठी हाताचा इशारा करुन त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी राजापूर पोलीसांनी शहरातीत एका रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली आहे.
त्या पिडीत महिलेच्या तक्रारीवरून, रिक्षा चालक महेश महादेव होलम रा. राजापुर चव्हाणवाडी याच्या विरोधात भा. द. वि. कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या मालकीची रिक्षा क्र. एम. एच. ०८/के / ३८५२ जप्त करण्यात आली असून त्यालाही अटक करण्यात माहिती पोलीसांनी दिली आहे. मंगळवार 17 ऑक्टोबर तसेच त्यापुर्वी वारंवार हा प्रकार घडल्याचे या महिलेने तक्रारीत नमुद केले आहे.
रिक्षा चालक होलम हा गेले काही दिवस वारंवार आपला पाठलाग करून रिक्षात बसण्यासाठी जबरदस्ती करत होता. रिक्षात बसण्यासाठी हाताचा इशारा करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता असे या पिडीत महिलेने तक्रारीत नमुद केले आहे. या पिडीत महीलेच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी महेश होलम याच्या विरोधात भा. द. वि. कलम ३५४ ड अन्वये गुन्हा दाखल करून त्यास रिक्षासह ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी अधि तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीमती शिल्पा वेंगुर्लेकर करत आहेत.