
श्री किंजळादेवी शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन
राजापूर :श्री किंजळादेवी युवा मंडळ तुळसुंदे ता, राजापूर यांच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त खास झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेत विजेत्या पहिल्या स्पर्धकाला रोख रुपये ७०००, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये ४०००, तृतिय क्रमांकासाठी रोख रुपये २००० तर उत्तेजनार्थ म्हणून १००० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्व महिला ग्रुप साठी मोफत आहे. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकाचा पेहेराव झिम्मा फुगडी नृत्यास साजेसा असणे आवश्यक असणारं आहे. प्रथम येणाऱ्या संघाना प्राधान्य देण्यात येईल आणि परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धाप्रवेशासाठी संपर्क*
प्रसाद खडपे- 9021465451
जयंत- 8459407097
नितु- 9359170269
संकेत-9604148121
योगेश- 9405979163.
यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.