
जॉब फ्रॉम होमच्या नादात गमावले 10 हजार
रत्नागिरी: घरात बसून पैसे कमावण्याची हौस हातखंबा येथील एकाला 10 हजारांना पडली आहे. जॉब फ्रॉम होमच्या नादात आपल्या खात्यातील 10 हजार रुपये त्यांनी गमावले. ही घटना 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी विनित गुप्ता विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात सुर्यकांत भिकाजी बोंबले (38,रा.बोंबलेवाडी हातखंबा,रत्नागिरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार,18 ऑगस्ट 2023 रोजी ते आपल्या मोबाईलवर फेसबुक अकाउंट बघत असताना त्यांना त्यावर नटराज पेन्सील पॅकिंगवर जॉब फ्रॉम होम लेडीज अँड जेंटस अशी जाहिरात दिसली. त्यामध्ये दिलेल्या विपिन गुप्ताच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क साधला असता त्याने नटराज पेन्सीलबाबत माहिती देउन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गुगलपे नंबर नटराज पेन्सीलच्या मटेरीलयसाठी 9 हजार 960 रुपये आपल्या खात्यात जमा करुन घेतले. परंतु त्यानंतर फिर्यादीला नटराज पेन्सीलचे मटेरियल न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 420 माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.