
पोटमाळ्यावरुन पडून महिलेचा मृत्यू
रत्नागिरी : घराच्या पोट माळ्यावर साफसफाई करत असताना पडलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. मंगला जनार्दन झोरे (वय ५७, रा. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) पहाटे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगला झोरे या पहाटे लवकर उठून घराच्या पोट माळ्यावर साफसफाई करत असताना पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान रविवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.