
३०० कोटींचा टप्पा पार करण्याचं उद्दिष्ट ठेवत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची दसरा दिवाळी ठेव योजना जाहीरः ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची लोकप्रिय असलेली व सणांचे औचित्य अधिक उत्सवी करण्यासाठी प्रतिवर्षी घोषित होणारी दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना दि.१५ ऑक्टोबर पासून प्रारंभित होत आहे.
दसरा दिवाळी स्वागत ठेव योजनेत आकर्षक व्याजदर पतसंस्थेने निश्चित केले असून स्वरूपाजंली ठेव योजनेसाठी सर्वसामान्य ८% तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना ८.२५% व्याजदर रहाणार असून १२ ते १८ महिने हा ठेव कालावधी राहणार आहे. तर सोहम ठेव योजना ही १९ ते ३६ महिन्यांसाठी असून सर्वसामान्य व्याजदर ८.२५% तर महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ८.५०% व्याजदर रहाणार आहे. पाच लाखांपेक्षा अधिकची ठेव एकरक्कमी ठेवणाऱ्या ठेवीदारांसाठी ८.६०% व्याजदर १२ ते १८ महिने या योजनेसाठी रहाणार आहे.
ठेवीदारांच्या स्वागता साठी 17 शाखा सज्ज
दसरा दिवाळी ठेव योजनेत सर्वदूर संपर्क करून ठेवीदारांना ठेव गुंतवणुकीसाठी आकृष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या १७ ही शाखा कार्यालयात या उत्सवी ठेव योजनेचे औचित्य ठेवत ठेवीदारांच्या स्वागताची जय्यत तयारी ठेवण्यात आली आहे.
भक्कम अर्थविश्व
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत आज अखेर २९१ कोटींच्या ठेवी असून २०३ कोटींची कर्जे, रु.१३१ कोटींची गुंतवणूक, ४२ कोटी १५ लाखांचा स्वनिधी, ९९.३२% वसुली, ६०.८४% सीडी रेशो, २५% CRAR, 0% NPA, “अ” ऑडीट वर्ग, ३४४ कोटींचे खेळत भांडवल अशी ठेवीदारांना आश्वस्त करणारी भक्कम आकडेवारी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने राखली आहे.
300 कोटींचा ठेव टप्पा पूर्णत्वाकडे
३०० कोटी ठेव संकलनाचा टप्पा गाठण्यासाठी संस्थेला केवळ ९ कोटींची आवश्यकता आहे. दसरा दिवाळी ठेववृद्धी मासाच्या या अभियानात ३०० कोटींचा ठेव टप्पा पूर्ण होईल आणि ३०० कोटींच्या ठेवी असलेली पतसंस्था म्हणून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था हि बिरुदावली ठेवीदारांच्या प्रतिसादामधून स्वरूपानंदला प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करताना ठेवीदारांनी मोठ्या रक्कमेच्या ठेवी संस्थेत गुंतवून आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.