
परटवणे साई मंदिर येथे २१ रोजी तालुकास्तरीय ढोल स्पर्धा
रत्नागिरी:- नवरात्र उत्सवानंतर परटवणे साई मंदिर येथे तालुकास्तरीय ढोल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत या स्पर्धा होणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील परटवणे साई मंदिर येथे नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. यंदाचे २५ वे वर्ष असून रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय ढोल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम १०,०००/-, द्वितीय ५,०००/-, तृतीय ३,०००/-, उत्कृष्ट ढोलवादक व ताशा वादक यांना आकर्षक चषक दिले जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी २० ऑक्टोबर पर्यंत नावे नोंदवावीत तसेच प्रथम १६ संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेसाठी सुयोग धुळप- ७६२०३८२७४४ व प्रणव रजपूत- ९२८४२१३२६६ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.