
दिवाळीसाठी कोरे मार्गावर एलटीटी-मंगळुरू विशेष साप्ताहिक गाडी
रत्नागिरी:दिवाळीच्या सणामुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि दक्षिण रेल्वेने कोकण मार्गावर विशेष एलटीटी-मंगळुरू विशेष साप्ताहिक गाडी सोडण्याचे नियोजन केले आहे.
गाडी क्र. 01185 /01186 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू साप्ताहिक गाडी येत्या शुक्रवारपासून (दि. २० ऑक्टोबर) धावणार आहे. एलटीटीहून २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता मंगळुरूला पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता मंगळुरूहून ही गाडी २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि रविवारी दुपारी अडीच वाजता एलटीटीला पोहोचेल.
गाडी कोकणात ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडीला थांबेल. गाडीला २१ डबे असतील. त्यात टू टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचे पाच, स्लीपरचे आठ, तर सर्वसाधारण पाच डबे असतील.