
अंजुमन-ए-उर्दू असातजा रत्नागिरीच्या वतीने राज्यस्तर आदर्श शिक्षक पुस्कार प्राप्त श्री. मुनाफ गुहागरकर यांचा सत्कार
रत्नागिरी :फेरोग-ए-उर्दू व बानू एज्युकेशन नांदेड यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील उपक्रमशील उर्दू शिक्षक श्री. मुनाफ नुरमहंमद गुहागरकर यांना नुकताच 2 ऑक्टोबर 2023 रोजी उर्दूघर नांदेड येथे राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अंजुमन-ए-उर्दू असातजा रत्नागिरीच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करून त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थी व शिक्षकांसाठी अंजुम-ए-असातजा रत्नागिरी ही संस्था कार्यरत आहे.
श्री. मुनाफ गुहागरकर हे तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक असून ते नेहमी विविध शैक्षणिक उपक्रम राबविताना दिसतात तसेच उर्दू माध्यमासाठी नेहमी अग्रेसर असतात.त्यांनी यापूर्वी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी व शिक्षकांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. डाएट रत्नागिरी येथे कार्यरत असताना देखील त्यांनी उर्दू मध्यम शिक्षक व विद्यार्थ्यासाठी “उमंग, उडाण” सारखे अनेक नवोपक्रम जिल्हयात राबविले आहेत ज्यांची नोंद रजस्तरावर देखील घेण्यात आली आहे.
जील्हयाभरातील अनेक उर्दू व मराठी शिक्षक मित्रांनी पुरास्कार मिळाल्याबद्दल त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव केला व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.