
न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी माहेर संस्थेच्या अनाथ मुलींसमवेत साजरा केला आंतरराष्ट्रीय बालिका दिन
संगमेश्वर :तालुक्यातील न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा करत निवळी येथील माहेर संस्थेत असलेल्या अनाथ बालिका समवेत खाऊची भेट देत आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला.या अनोख्या उपक्रमाचे अनेक समाजिक संस्थेने कौतूक करत न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे आणि संस्थेचे कौतूक केले आहे.
आज देशात विविध उपक्रम राबवत आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला मात्र नवनिर्मिती फाउंडेशन संचलित न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपले खाऊचे पैसे जमा करून सामाजिक भावनेतून निवळी येथे असणाऱ्या माहेर संस्थेमधील अनाथ विद्यार्थिनींनी बरोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला. विद्यार्थिनींनी जमा केलेल्या पैशाच्या माध्यमातून तेथे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे खाऊ, बिस्कीट,चिक्की आज त्यांना देणगी स्वरूपात त्या संस्थेला भेट देऊन वितरित केले. एवढ्या लहान वयामध्ये या मुलांच्या मध्ये असणारी सामाजिक भावना दिसून आली. त्यांना माहेर मधील अनाथ लोकांची परिस्थिती बघून अनेकांचे डोळे भरून आले. आपल्या हातून सुद्धा एक चांगलं समाजकार्य उपयोगी कार्य घडावे या उद्देशातून न्यू. व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचे भान राखत हा आगळा वेगळा उपक्रम करत आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य सलाऊद्दीन बोट, सलीम सय्यद, मुख्यापिका नाजीमा बांगी, सिमरन मालदार,सुजेन अलजी, सारा खान, आजरा शेख, नगमा अलजी, राहिला खान, अकलिमा परदेशीं,तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ज्या ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून दिले त्यांचे शाळेच्या वतीने आभार मान्यात आले.
