
खेड येथे २५ हजाराच्या लॅब जनरेटरची चोरी
खेड :तालुक्यातील खवटी येथील न्यू इंग्लिश स्कूल व पी. के. दरेकर ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता ७ वीच्या जुन्या वर्गाचा कडीकोयंडा उचकटून त्याव्दारे वर्गामध्ये प्रवेश करून वर्गामध्ये ठेवलेला २५ हजार रुपये किंमतीचा चॅम्प कंपनीचा लाल रंगाचा जनरेटर अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
सदर घटना दि. ७ ऑक्टोबर रोजी १२:३० ते दि. ९ ऑक्टोबर २०२३ सकाळी ०८:१५ वाजताच्या मुदतीत घडली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. कलम ३८०, ४५४ व ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.