घुडेवठारच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी : फिट येण्याचा त्रास असलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओमकार संतोष मयेकर (वय २१, रा. घुडेवठार, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना २१ सप्टेंबरला घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओमकारला फिट आल्याने तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआरला दाखल केले होते. उपचार दरम्यान ३० सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.