
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या 5 व्या पूर्णगड शाखेचे 08 ऑक्टोबर ,2023 रोजी उद्घाटन
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा स्थरावरील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पूर्णगड शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 08 ऑक्टोबर,2023 रोजी सकाळी 09.30 वा.प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी भूषविणार आहेत.
124 अ,श्री.हरिश्चंद्र प्रभाकर मुरकर ,एस.टी. स्टँड, पूर्णगड. तालुका- गुहागर, जिल्हा- रत्नागिरी या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
त्यानिमित्त सर्व सभासद व हितचिंतक बंधू-भगिनींनी या उद्घाटन सोहळा कार्यक्रमा साठी उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधीर वासावे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे, संस्थापकीय अध्यक्ष व विद्यमान संचालक कमलाकर हेदवकर,पूर्णगड शाखेचे पालक संचालक वासुदेव वाघे ,सहपालक संचालक दिनेश डोर्लेकर व सहपालक संचालक मदन डोर्लेकर अन्य संचालक बंधू-भगिनी, कर्मचारी वृंद व सर्व समन्वय समिती सदस्य यांनी केले आहे.