
अल्पवयीन मुलीची फसवणूक प्रकरणी संशयितास जामीन
खेड :अल्पवयीन मुलीची फसवणूक करुन पळवून नेल्याप्रकरणी संशयितांस अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
संशयित आकाश जाधव याच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात भादवि कलम ३६३, ३७६(२)(एन), ३७६(३), ३६६(ए), ४१७ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीची फसवणूक करुन तिला पळवल्याची तक्रार केली होती. त्याप्रमाणे संशयित याला पोलिसांनी अटक केली होती. त्याने खेडमधील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला.
ॲड. स्वरुप थरवळ यांनी अर्जावर युक्तिवाद केला. त्यावेळी उच्च न्यायालयातील निकाल हजर केले होते. हा युक्तिवाद ग्राह्य मानून संशयित तरुणास अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे