
रेल्वेत चढणाऱ्या महिलेची १ लाख किमतीची बांगडी अज्ञात चोरट्याकडून लंपास
संगमेश्वर: रेल्वे स्टेशन येथे नेत्रावती एक्स्प्रेस गाडीमध्ये चढणाऱ्या महिलेची १ लाख किमतीची १७ ग्रॅम वजनाची बांगडी अज्ञात चोरट्याने पळविली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ सप्टेंबरला रात्री दोनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी महिला नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची १७ ग्रॅम वचनाची १ लाखाची बांगडी पळविली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.