
देवळे जंगलवाडी येथील दोन घरांवर वीज पडल्याने नुकसान
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील दोन घरांमध्ये वीज घुसून विद्युत उपकरणांचेही नुकसान झालं असून एका व्यक्तीला वीज चाटून गेल्यामुळे विजेचा थोडा धक्का बसला.
रविवारी पडलेल्या मुसळधार पावसातून विज पडून देवळे जंगलवाडी येथील दोन घरांचे विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलवाडी येथील चंद्रकांत सिताराम गोताड व बुधाजी तानू दळवी यांच्या घरावर वीज पडून दोघांचेही विद्युत मीटर जळाले तसेच घरातील पूर्ण वायरिंग जळाले असून टीव्ही फॅन व लाईट ट्यूब अशा सामानाची मोठ नुकसान झाले आहे. तर घरालाही विजेचा धक्का बसला आहे.