
जमातुल मुस्लीमीन शिवखोल रत्नागिरी यांचे वतीने ईद ए मिलाद उत्साहात साजरी
रत्नागिरी :प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी ईद ए मिलाद साजरी करण्यात येते.मुस्लीम बांधव मिरवणूक काढतात व पैगंबरांनी घालून दिलेल्या आदेशानुसार लोकांनी कसे वागावे याचे व्याख्यान आयोजित करतात.
रत्नागिरी शहरातील शिवखोल येथे जमातुल मुस्लीमीन शिवखोल यांच्या वतीने ईद ए मिलाद सण साजरा करण्यात आला.यावेळी लहान मुलांनी व पैगंबर यांच्या जीवनावर नातशरीफ आपल्या सुरेल आवाजात सादर केली,या सर्वांना जमातीच्या वतीने व जमात चे सदस्य निजामुद्दीन स.इब्राहीम काद्री, मुंबई यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.
पैगंबरांचे जीवन आणि त्यांनी जगाला दिलेल्या संदेशाबद्दल मौलाना हाजी जमीरुल हसन यांनी माहिती दिली.यावेळी जमातीचे प्रभारी अध्यक्ष मकसूद स.हसन काद्री यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे निवेदन व आभार जमातीचे सचिव शकील गवाणकर यांनी केले.या कार्यक्रमाला शिवखोल, निवखोल,राजिवडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.