
दापोलीतून एकाच दिवशी दोन दुचाकींची चोरी
दापोली : दापोलीत दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला असून शहरातून १८ सप्टेंबर रोजी दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अफसर अन्सारी (२६ रा. काळकाई कोंड मंदिरासमोर) हे सोमवार दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान दापोली बाजारपेठ येथे दुकानासमोरून त्यांची अॅक्टिव्हा गाडी चोरीस गेली.
निलेश वानखेडे (४० रा. राजाहिल नगर एमआयडीसी रोड अमरावती सध्या साहिल पॅराडाईज गिम्हवणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ८ ते ८:३० वाजण्याच्या मुदतीत ते दापोली येथील प्रेसिडेन्सी रेस्टॉरेंट बार येथील पार्किंगमध्ये पांढऱ्या रंगाची मोपेड व्हीलर लावून गेले होते. प्रेसिडेन्सी रेस्टॉरंटमधून बाहेर आले असता त्यांची मोपेड दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला परंतु कोठेही गाडी आढळून आली नाही म्हणून त्यांनी फिर्याद नोंदविली.