
आजारपणाला कंटाळून महिलेची गळफास घेत आत्महत्या
चिपळूण : आजारपणाला कंटाळून शहरातील काविळतळी येथील एका महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २२ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
वंदना वसंत पवार (६८, रा. शिवम अपार्टमेंट, काविळतळी) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबतची खबर तिच्या मुलीने चिपळूण पोलिसांना दिली. वंदना पवार यांनी आपल्या घरातील बेडरूमध्ये नायलॉनच्या साडीने आजारपणाला कंटाळून गळफास लावून घेतल्याची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.