
खंडाळा येथे तळीरामावर कारवाई
रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा नाका येथे दारुच्या नशेत हेलकावे खात जाणाऱ्याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सोमवार १८ सप्टेंबर रोजी ६.३० वा. करण्यात आली. साहिल वसंत ढवळे (२१, रा. वाटद मिरवणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी जयगड पोलिस गस्त घालत असताना त्यांना खंडाळा नाका येथील सरकार मान्य देशी दारूच्या दुकानाजवळ तो हेलखावे खात जात असताना दिसून आला. पोलिसांनी त्याच्याकडे दारू पिण्याच्या परवान्याची मागणी केली असता परवाना नसल्याकारणाने याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. साहिल ढवळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.