
रत्नागिरी बसस्थानकासमोर रस्त्यावर भलामोठा खड्डा; वाहनचालकांच्या जीवाशी खेळ
रत्नागिरी :शहरातील रत्नागिरी बसस्थानक समोरील रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. मुख्य रस्त्यावर रहदारीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहन चालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. रनपचा गलथान कारभार फटका अनेकांना बसत असल्याचे बोलले जात आहे.
शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. मात्र मंगळवार पासून शहरातील एसटी स्टँड समोरील रस्त्यावर पडलेला भलामोठा खड्डा चर्चेत आला आहे. याच खड्ड्यातून बाप्पाचे देखील आगमन झाले. बुधवारी हा खड्डा आणखी मोठा झाला आहे. या खड्ड्यामुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. रनपच्या आणखी एका गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागिकांना बसत आहे.