
गुरुवर्य अ.आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर, श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेजमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन
रत्नागिरी: केवळ पावसाळ्यातच उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांनी करून घ्यावी व आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करावा या रानभाज्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात असे प्रतिपादन हातखंबा प्रशालेचे स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन श्री सुनील दत्त उर्फ आप्पा देसाई यांनी केले.
हातखंबा येथील गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर व श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय हातखंबा येथे रानभाज्यांची प्रदर्शन भरविण्यात आले होते.इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या भाज्या अतिशय आकर्षक पद्धतीने मांडलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण 35 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तसेच ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रथम क्रमांक साध्वी समीर शिवगण, द्वितीय क्रमांक स्वरा सचिन देसाई, तृतीय क्रमांक तनुजा रामचंद्र मासाळ तर आठवी ते दहावी या गटामध्ये प्रथम क्रमांक ईश्वरी समीर शिवगण, द्वितीय क्रमांक नूतन निलेश डांगे, तृतीय क्रमांक ऋतुजा चंद्रकांत तारवे तसेच कॉलेज गटामध्ये प्रथम क्रमांक ऋतिका विनोद सनगरे, द्वितीय क्रमांक सानिया अनिल कुडतरकर, तृतीय क्रमांक सावरी गजानन जठार या विद्यार्थिनींनी यश मिळविले या प्रदर्शनामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी टाकळा, अळू, भारंगीची फुले, भारंगीची पाने, सुरणाची पाने, सुरणाचा कंद, फोडशी, आळंबी, कुर्डू इत्यादी विविध प्रकारच्या भाज्या प्रदर्शनामध्ये आकर्षकपणे मांडून या भाज्यांची माहिती, औषधी गुणधर्म, पाककृती इत्यादीचे उत्तमरीत्या सादरीकरण केले. या प्रदर्शनाचे परीक्षण प्रा. सुभाष रानमाळे, श्री अजय बिराजदार, श्री सुहास चव्हाण या शिक्षकांनी केले. या प्रदर्शनामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुनील दत्त देसाई यांनी प्रदर्शनाचे स्वतः परीक्षण करून काही विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन श्री सुनील दत्त देसाई यांनी केले प्रतिमापूजन स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य प्रा चंद्रमोहन देसाई यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक पालक संघाचे सदस्य, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ निशा पवार, शाळेचे प्राचार्य श्री व्ही. जी. परीट उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे नियोजन सौ. मधाळे एम. एस., प्रा. अनिता पाटील, प्रयोगशाळा सहाय्यक आरती मयेकर, ग्रंथपाल सौ. सुष्मिता पवार, प्रा. मनस्वी जाधव, भिमसिंग गावित, श्री कुमार चव्हाण सर इत्यादींनी केले.
कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचे उपाध्यक्ष गिरीश शीतप, सदस्य सचिन सावेकर,श्री गजानन जठार, शिक्षक पालक व माता पालक संघाचे सदस्य तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुभाष रानमाळे यांनी तर आभार कुमार चव्हाण यांनी मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.