
जनावरे वाहतूकप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नजीकच्या जगबुडी पुलानजीक बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास गुरे वाहतूक करणाऱ्या दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद मुरलीधर चव्हाण, सचिन मुरलीधर चव्हाण अशी त्या गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. मोटारीतून ५ बैल बांधून त्याची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी ४ लाखाचा गाडी, ५० हजाराचे चार बैल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.