खेड येथे दुकानाचे शटर तोडून चोरी
खेड :शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बसस्थानकाच्या मागील सुपर मार्केट मध्ये मोहीमतुले झेरॉक्स सेंटर सोमवारी दि. ११ रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. दुकानाचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यातील दहा ते अकरा हजार रुपयांची रोकड चोरून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, खेड शहरात भरवस्तीत मोहीमतुले झेरॉक्स सेंटर या ठिकाणी ही चोरी झाली आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेले मालक जलाल मोहिमतुले यांना दुकानाचे शटर व कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर खेड पोलिसांना मोहीमतुले यांनी कळवल्यानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.